सिल्लोड, (प्रतिनिधी): लिहाखेडी येथे मुर्डेश्वर कनिष्ठ महाविद्यालय व मुर्डेश्वर हायस्कूल येथे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बाल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुर्डेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक राजपूत हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुर्डेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. कळात्रे हे होते.
या कार्यक्रम प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे कार्य व देशाच्या प्रगती मधील मोठा सहभाग आणि विशेष करून बालकांसाठी त्यांचे कार्य मोलाचे आहे असे याविषयी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक खैरनार यांनी केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या स्वातंत्र्यात भाग घेऊन देशाचे पहिले पंतप्रधान पदही त्यांनीच बसवले. १९६४ पर्यंत ते आपल्या देशाचे पंतप्रधान असताना देशातील युवक व बाल वर्ग यासाठी विविध योजनातून देशाचा प्रगतीचा मार्ग त्यांनी आखला होता. आणि यातूनच पुढे त्यांनी आपल्या देशाची प्रगतीसाठी विविध मार्ग निर्माण करून देशाची प्रगती साधण्यासाठी मोठ्या नियोजनातून त्यांनी देशात प्रगतीपथावर आणले.
प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य काळात्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या देशातील विविध क्षेत्रात प्रगतीसाठी औद्योगिक क्षेत्र असेल किंवा शैक्षणिक कार्यावर मोठा भर देऊन अल्पवयीन बालकांना कामावर न ठेवता त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे विशेष कार्य आपल्या देशात केले. आणि आज त्यांचेच फलित आज आपला देश शिक्षण क्षेत्रामध्ये जगामध्ये खूप पुढे आहे.
अध्यक्षीय भाषणामध्ये राजपूत यांनी विद्यार्थ्यांना जहाल मतवादी व मावळ मतवादी असे दोन गट आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात अस्तित्वात होती, आणि या दोन्ही गटांचे एकच उद्देश होता की त्यांनी आपल्या देशात स्वातंत्र्य मिळवायचे होते. पंडित जवाहरलाल नेहरू ही मवाळवादी स्वरूपाच्या गटात सामील होऊन त्यांनी १९१३ पासून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी स्वातंत्र्य संग्रमात सहभाग घेतला. आपला भारत देश त्यांनी स्वातंत्र्य ही केला.
स्वातंत्र्यानंतर पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाच्या विविध विकास कामात त मोठा सहभाग नोंदवला आणि आज आपल्या देशाला स्वातंत्र्यानंतर उंच शिखरावर त्यांच्या कल्पनातून पोहोचवण्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप सुतार मॅडम यांनी आभार प्रदर्शन करून केला. याप्रसंगी कार्यक्रमासाठी पवार सर कोल्हे मॅडम खैरनार मॅडम उबाळे सर ठोंबरे सर रामभाऊ कळात्रे व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमा यशस्वी केला.














